राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी आर. एन. यादव

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आर. एन. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी आर. एन. यादव
R.-as-the-Vice-President-of-the-NCP.-N.-Yadav

राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी आर. एन. यादव


कल्याण (kalyan) :राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party) पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आर. एन. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अभिप्रेत असलेली पक्षसंघटना बांधण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या संमतीने व राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या मान्यतेने हि निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटीचे (Nationalist Congress Committee) जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांनी दिले आहे.

       आर. एन. यादव यांनी गेली अनेक वर्षे कल्याण (Kalyan) डोंबिवली (Dombivali) सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढीसाठी काम केले आहे. अनेक सामाजिक प्रश्नांसाठी पाठपुरावा तसेच आंदोलने देखील केली आहेत. त्यांच्या या कामाची दखल पक्षाने घेत त्यांच्यावर पनवेल जिल्हा उपाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवली आहे. पक्षाने आपल्यावर सोपवलेली हि जवाबदारी जिल्ह्यातील सर्व नेते व कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन पार पाडणार असून या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याची माहिती आर. एन. यादव यांनी दिली.

       यावेळी जिल्हाध्यक्ष सतीष पाटील, शिवदास काबंळे, किशोर देवधेकर, भाऊ लबडे, कृष्णा मर्ढेकर, सुरेश राजवण, महेशकुमार राऊत, प्रदिप पाटील, नारायण गायकवाड, गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______

Also see : भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर

https://www.theganimikava.com/BJP-teachers-alliances-welfare-executive-announced