पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार

आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार
Pune Municipal Corporation news

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार

आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. 

महापालिका निवडणुकीत पुण्यात  राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा  फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  यांनी केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. (The flag will be hoisted on Pune Municipal Corporation)

सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला.पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत.  तर राष्ट्रवादी 44, काँग्रेस 9 आणि शिवसेनेकडे 9 जागांचं बळ आहे.


शिवेसना नेते संजय राऊत  यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पुणे दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली .पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे.(The flag will be hoisted on Pune Municipal Corporation)

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.