राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की चा शहापुर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध
राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा शहापुर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे...

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा शहापुर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध
उत्तरप्रदेश सरकार व केंद्र सरकार दडपशाही चे राजकारण करत असून हाथरस मध्ये घटनास्थळी जात असलेल्या राहुलजी गांधी यांना पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की ही अत्यंत निंदनीय घटना असून शहापुर तालुका काँग्रेस तर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
तालुका काँग्रेस चे अध्यक्ष महेश धानके यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या घटनेचा निषेध नोंदवला आहे, त्यांनी पत्रकात म्हंटले आहे की देशात व उत्तरप्रदेश मध्ये भाजप सरकार आल्यापासून बहुजन, दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत,दिवसाढवळ्या एका युवतीवर पाशवी अत्याचार होत असूनही सरकार झोपेचे सोंग घेत आहे,सदर मुलीच्या कुटुंबाची भेट घेणे हा राहुल गांधी यांचा गुन्हा आहे काय ? असा संतप्त सवाल करून शहापुर काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_______
Also see : 28 पोकलेन, 60 टिपर कामाला, अजितदादांनी मनावर घेतलं तर काय बदल होऊ शकतो पहा बारामतीच्या नीरा डावा कालवा चे नूतनीकरण करून रूपच पालटले !