एमपीएससीची परीक्षा लांबणीवर टाकणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध -ॲड.सदानंद वाघमारे
बीड जिल्हायेथील अनेक वर्षापासून राज्य शासनाने शासकीय पद भरती केलेली नाही अनेक विद्यार्थी एमपीएससी मार्फत शासकीय सेवेमध्ये रुजू होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात....

एमपीएससीची परीक्षा लांबणीवर टाकणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध -ॲड.सदानंद वाघमारे
बीड जिल्हायेथील अनेक वर्षापासून राज्य शासनाने शासकीय पद भरती केलेली नाही अनेक विद्यार्थी एमपीएससी मार्फत शासकीय सेवेमध्ये रुजू होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात .खेड्यापाड्यातून तांड्या वाड्या-वस्त्या वरून हे विद्यार्थी शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपली गावे सोडून येतात.त्यांच्या पालकांना आपला मुलगा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळेल या आशेवर खेड्यापाड्यातील भाबडे पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करून मोलमजुरी करून कारखान्यावर ऊस तोडणी करून पैसा पुरवतात परंतु त्यांची राज्यशासनाकडून निराशा होत असल्याचा आरोप जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव ऍड. सदानंद वाघमारे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना इतर समाजातील विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम राज्यशासन करत असल्याचा आरोप ॲड.सदानंद वाघमारे यांनी केला आहे .राज्य शासनाने लांबणीवर टाकलेल्या एम पी एस सी च्या परीक्षा तात्काळ न घेतल्यास जनप्रहार सामाजिक संघटनेच्यावतीने राज्य शासनाच्या विरोधात एस.सी एसटी ओबीसी एन.टी च्या स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव ॲड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : केडीएमसी क्षेत्रात थकीत करदात्यांसाठी अभय योजना लागू
https://www.theganimikava.com/Abhay-Yojana-implemented-for-tired-taxpayers-in-KDMC-area