रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भाग्यश्री तोंडलीकरचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न 

आशिया खंडातील मिस डिवा इंटरनॅशनल भाग्यश्री तोंडलीकरचा मुरबाड मध्ये जाहीर सत्कार 

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भाग्यश्री तोंडलीकरचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न 
Public felicitation ceremony of Bhagyashree Tondlikar on behalf of Republican Employees Federation

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भाग्यश्री तोंडलीकरचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न 
   

आशिया खंडातील मिस डिवा इंटरनॅशनल भाग्यश्री तोंडलीकरचा मुरबाड मध्ये जाहीर सत्कार 

   मुरबाड तालुका हा म्हसा यात्रे साठी प्रसिद्ध आहे. ही कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जात असताना याच मुरबाडच्या मातीत जन्मलेल्या भाग्यश्री अजय तोंडलीकर या हरहुन्नरी मुलीने आशिया खंडातील मिस दिवा इंटरनॅशनल (Miss Diva International from Asia), मिस युनिव्हर्स (Miss Universe) हा मानाचा किताब मिळविल्याने मुरबाड तालुक्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याने मुरबाडकरांच्या पदरात भाग्यश्री च्या मानाच्या तूर्ऱ्याने मुरबाड करांची मान उंचावली आहे. त्याची दखल घेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने (Republican Employees Federation) जाहीर सत्कार समारंभ आयोजित करून मुरबाड तालुक्यातील सर्वप्रथम मानाचा तुरा तिच्या डोक्यावर चढवला आहे.त्यामुळे सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

 
यावेळी भाग्यश्रीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राज्य, जिल्हा पातळीवर अनेक सत्कार झाले. परंतु फेडरेशनने माझा मुरबाड तालुकास्तरावर व माझ्या गावात  केलेला सन्मान हा अविस्मरणीय आणि माझ्या जीवनातील पहिला सत्कार आहे. तो मी कधीच विसरणार नाही, असे सत्कार स्वीकारताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे (Republican Employees Federation) जिल्हा संपर्कप्रमुख संजय थोरात साहेब, जिल्हाध्यक्ष भगवान पवार सर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष डी.एस.शिंदे साहेब,  जिल्हा कार्याध्यक्ष गौतम रातांबे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सरनोबत जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संजय धनगर, जिल्हा सरचिटणीस सुनील गायकवाड, दैनिक पुढारीचे पत्रकार बाळासाहेब भालेराव, जिल्हा काँग्रेसचे पर्यावरण अध्यक्ष नरेश मोरे, शहापूर तालुकाध्यक्ष कमलाकर वांगीकर सर व संपूर्ण शहापूर तालुका कार्यकारणी  तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ व प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आरपीआय आठवले पक्षाचे (RPI Athavle Party) मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, तालुका सरचिटणीस भूपेश साठपे,मनसे शहराध्यक्ष नरेश देसले, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन फेडरेशनचे मुरबाड (Republican Employees Federation) तालुका अध्यक्ष मनोहर पवार सर, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, फेडरेशनचे संपर्क व प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण पवार यांनी केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाग्यश्रीला शाळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश धनगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस सुनील गायकवाड यांनी केले. यावेली म्हसा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पंकज चंद्रकांत धनगर तर उपाध्यक्षपदी राजेश प्रकाश धनगर, अजय किसन जाधव व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी  नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरबाड कोविडी केअर सेंटर (covid care center) मध्ये व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी एका सुशिक्षित तज्ञ अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी,अशी मागणी फेडरेशनच्या वतीने पंचायत समितीचे सभापती श्री. श्रिकांत धुमाल यांच्याकडे करण्यात आली आहे.

भिवंडी 

प्रतिनिधी - सत्यवान तरे

_________

Also see:नवि मुंबईत भाजपाच्या वतीने घंटा नाद आंदोलन

https://www.theganimikava.com/bjps-ghantanad-andolan-at-ghansoli-navi-mumbai