प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान
बीड जिल्ह्याचे पालकlमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान करण्यात आले...

प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकlमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान करण्यात आले.
परळी शहरातील विविध भागातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३५७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यांपैकी ४०६ लाभार्थींना धनादेश वाटप करण्यात येत आहेत. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ४० हजार रुपये रक्कमेचे धनादेश वितरित कयण्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. घरकुल योजनांमूळे परळीच्या जुन्या गावभागात नविन वास्तू निर्मिती होतील.या अनुषंगाने प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश वाटप कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष जाबेरखान पठाण, नगरसेवक अनिल आष्टेकर, गोविंद कुकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : मोबाईल रिचार्ज कंपन्या विरुद्ध नागरिकांची संतापाची लाट -ज्ञानेश्वर कवटेकर