संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना कल्याण कार्यालातून सेवा द्या
केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेसाठी तसेच इतर विविध योजनांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते.

संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना कल्याण कार्यालातून सेवा द्या
माजी नगरसेवक भीमराव डोळस यांची मागणी
कल्याण (kalyan) : केंद्र सरकारच्या (central gov) संजय गांधी निराधार योजनेसाठी (sanjay gandhi nirdhar) तसेच इतर विविध योजनांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शहाड, मोहने, अटाळी, आंबिवली, टिटवाळा, गाळेगाव, वडवली आदी भागातील महिलांना अंबरनाथ येथील तहसीलदार कार्यालयात जावे लागत असल्याने या महिलांना कल्याण तहसीलदार कार्यालयातून सेवा देण्याची मागणी माजी नगरसेवक तथा रिपाइंचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव भीमराव डोळस यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी विधवा घटस्फोटीत महिलांना दरमहा मानधन देण्यात येते. त्यासाठी वार्षिक उत्पन्न सुमारे एकवीस हजार एवढे लागते. परंतु तलाठ्यांकडून दाखला देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे बऱ्याच गरजू व विधवा, घटस्फोटीत महिला सदर योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या रेशनकार्डनुसार उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा.
कल्याण पश्चिम मतदारसंघ (Kalyan West Constituency) वेगळा होण्याच्या आधी अंबरनाथ विधानसभा मतदार (Assembly voters) संघ असल्याने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शहाड, मोहने, अटाळी, आंबिवली, टिटवाळा, गाळेगाव, वडवली आदी भागातील महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात जावे लागते. यामुळे येथील महिलांना कल्याण तहसीलदार कार्यालयातून सेवा देण्याची मागणी माजी नगरसेवक भीमराव डोळस यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
कल्याण,ठाणे
प्रतिनिधी-कुणाल म्हात्रे
_____
ALSO SEE:कल्याणमध्ये भाजपाकडून वीज बिलांची होळी
https://www.theganimikava.com/Demand-for-waiver-of-all-electricity-bills-mseb