देशभरातील महिलांवरील वाढते अत्याचार व हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी वाडा येथे निषेध मोर्चा

देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तसेच हाथरस येथील पीडित तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना कडक शिक्षा व्हावी....

देशभरातील महिलांवरील वाढते अत्याचार व हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी वाडा येथे निषेध मोर्चा
Protest march at Wada to demand strict punishment for the accused in the Hathras case

देशभरातील महिलांवरील वाढते अत्याचार व हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी वाडा येथे निषेध मोर्चा


  वाडा : देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तसेच हाथरस येथील पीडित तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना कडक शिक्षा व्हावी व महिलांसाठी भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी दि.०८ ऑक्टोबर रोजी वाडा खंडेश्वरी नाका येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व तरूण व महीला वर्गांनी निषेध व्यक्त करुन वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम व वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
          
      याठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडलाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी निषेध व्यक्त करताना मत व्यक्त केले की, हाथरस (उत्तरप्रदेश) मधील ज्या भगिनीवर अत्याचार झाले ते निषेधार्थ आहे.त्याबरोबर त्या भगिनीच्या कुटूंबियांना जो मानसिक त्रास दिला त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो.

हाथरस (उत्तर प्रदेश) येथे एका युवतीवर झालेल्या अमानुष बलात्काराचे पडसाद देशभरात प्रत्येक संवेदनशील मनावर उमटत आहेत. देशात, विविध राज्यात ते स्थानिक पातळीवर आज असे कित्येक शारीरिक अत्याचार स्त्रियांवर सातत्याने होत असतात. बलात्कार ही विकृती समाज मनाला, सामाजिक जडण-घडणीला मारक आहे. ह्याचे ओरखडे संवेदनशील मनांवर सतत उमटत राहणार. हाथरस, निर्भया ते देशाच्या कानाकोपर्यात घडत असलेल्या अशाच कित्येक निंदनीय कृत्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. लैंगिक समानतेची ही न्यायहक्काची लढाई संविधानिक मार्गाने लढणे हे समाजाचे कर्तव्य आहे.यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तरुण व महिला वर्ग,तसेच विवीध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

________

Also see : कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस केले साजरे...

https://www.theganimikava.com/kalvan-taluka-ncp-celebrates-mla-nitin-pawars-birthday-in-a-unique-way-by-distributing-health-kits-to-covid-warriors