मुरबाडमध्ये भाजपा महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन !
महिला सुरक्षेसाठी नविन कायदा करण्याची केली मागणी !
मुरबाडमधे भाजपा महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन !
महिला सुरक्षेसाठी नविन कायदा करण्याची केली मागणी !
राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील महिलांवर अन्याय, अत्याचार व बलात्कार सारख्या घटनांत वाढ झाली आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंञी व गृहमंत्री यासंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलताना दिसत नाही . कोरोना सारख्या महामारीच्या संकटात कोवीड सेंटर व हाॕस्पिटल मधे सूद्धा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत अनेक महिला याला बळी पडल्या असताना महाआघाडीचे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून काही ठिकाणी आरोपिंना प्रशासनाकडून पाठबळ मिळत असून आरोपिंना शिक्षा होण्यास वेळकाढू पणा होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने नविन कायदा त्वरीत बनवून महिलांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संदर्भात प्रदेश महिला मोर्चाने 22 संप्टेंबरला राज्यभर निवेदने दिली होती तरी सूद्धा सरकारला अजून जाग आली नसल्याने आज भाजपा महिला मोर्चाच्या ठाणे जिल्हा ग्रामिणच्या अध्यक्षा शितल तोंडलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तहसिल कार्यालया समोर महाआघाडी सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला . या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे , तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव , जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, सभापती श्रीकांत धुमाळ,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे माजी उपनगराध्यक्ष नारायण गॊधली , मुरबाड तालुका सरचिटणीस दिलीप देशमुख हे उपस्थित होते. या वेळी मुरबाड तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वरा चौधरी, मुरबाड शहर महिला अध्यक्षा नगराध्यक्षा छाया चौधरी , जिल्हा सदस्या ज्योती गोडांबे , उपनगराध्यक्षा अर्चना विशे,माजी उपसभापती सिमा घरत , नगसेविका साक्षी चौधरी , उर्मिला ठाकरे, दीपाली करडे यांच्यासह असंख्य महिला या आंदोलनाला उपस्थितीत होत्या. या वेळी मुरबाडचे तहसिलदार यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
राज्यात सध्या जे आघाडीचे सरकार आहे ते तिन तिघाडा ना काम बिघाडा सरकार आहे. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून राज्यात महिलांवर वाढणारे अत्याचार हे चिंताजनक व खेदजनक आहे. असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी आघाडी सरकार विरोधात टोला लगावला आहे.
मुरबाड
प्रतिनीधी - लक्ष्मण पवार
________
Also see : शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक – डॉ. जे पी शुक्ला