लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने...

लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध
Protest against atrocities on Hathras victim on behalf of Lok Janshakti Party

लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


पुणे : लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आज बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.

  योगी सरकारचा धिक्कार करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारमधील घटक पक्ष असला तरी  रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी सामाजिक न्यायाच्या भूमिकेपासून हटणार नाही, हे निदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.

पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे, संजय चव्हाण,के.सी. पवार, अंकल सोनवणे, अमित दरेकर, जितेंद्र पासवान,वैशाली वाघमारे, संजय चव्हाण , सुरेश सहानी आदी उपस्थित होते.


................................................

पुणे 

प्रतिनिधी  -- अशोक  तिडके

_______