अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रविण घरत यांचे अल्पशा आजाराने निधन
वाडा तालुक्यातील नाणे गावातील उच्च शिक्षिक व पदवीधर नागरिक प्रविण श्रीधर घरत यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.८ सप्टेंबर) निधन झाले.

अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रविण घरत यांचे अल्पशा आजाराने निधन
वाडा तालुक्यातील नाणे गावातील उच्च शिक्षिक (Higher education) व पदवीधर नागरिक प्रविण श्रीधर घरत यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.८ सप्टेंबर) निधन झाले. प्रविण घरत हे पत्रकार रविंद्र घरत यांचे धाकटे बंधू असुन अपंग संघटक होते. प्रविण घरत हे अपंगत्वावर मात करून कुठेही नोकरी न करता आपल्या उदरनिर्वाह चालविण्यासाठी कष्ट करीत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांना शिवन क्लासेस शिकवण्यासाठी धडपड असायची. त्याचप्रमाणे प्रविण यांने सामाजिक बांधिलकी म्हणून वाडा तालुक्यातील अनेक गरजुं अपंगांना सेवा देण्याचे काम केले आहे. यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी, राज्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत मागितली नाही. त्यांच्या वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगी व मुलगा आहे. या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांचा स्वभाव रोखठोक व परखड असणारी व्यक्ती स्वभावाने मृदू होती. आज वाडा तालुक्याने अपंग सेवा संघटक, एक कणखर, झुंजार व संवेदनशील व्यक्तिमत्व तालुक्याने गमावले आहे नक्कीच त्याची कमतरता यापुढे वाडा तालुक्यातील अपंग नागरिकांना भासणार आहे.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
_________
Also see : सैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास आदेश | Military Commanders to be ready for any situation