वडपे येथे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रकाश पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी    

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी अंतर्गत कल्याण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कल्याण (kalyan) तालुक्यातील वडपे येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे.

  वडपे येथे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रकाश पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी    
Prakash Patil's demand to MP Shrikant Shinde to start Kovid Center at Vadpe

वडपे येथे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रकाश पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी अंतर्गत कल्याण (kalyan) तालुक्यातील कोरोनाबाधित (corona) रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कल्याण (kalyan) तालुक्यातील वडपे येथील कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यात यावे. अशी मागणी राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील आणि  ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुषमा लोणे यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वडपे येथे कोविड सेंटर (covid centre) करणे गरजेचे असून याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडपे  येथील 500 बेड्स अद्यावत कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना केल्या. दरम्यान कोविड सेंटरमधील सर्व बेड्स व्हेंटिलेटर असतील तसेच गरज भासल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी भिवंडी येथील सावाद येथे व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी, ठाणे

प्रतिनिधी - सत्यवान तरे

_________

Also see : कोरोनाच्या विळख्यातही आनंददायी बातमी ; भारताच्या पदरी सुवर्णपदक

https://www.theganimikava.com/India-wons-a-gold-medal-news-hunt-marathi-today