पोस्टर चिपका ओ गांधीगिरी आंदोलन..

एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे पगार द्या - बबन वडमारे...

पोस्टर चिपका ओ गांधीगिरी आंदोलन..
Poster Stick O Gandhigiri Movement
पोस्टर चिपका ओ गांधीगिरी आंदोलन..

पोस्टर चिपका ओ गांधीगिरी आंदोलन... 

एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे पगार द्या - बबन वडमारे

बीड लॉकडाऊन मध्ये एस टी महामंडळाचे (लालपरी) एस टी बस सेवा बंद होती ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, पण तीन महीण्या पासुन पगार होत नसल्या मुळे वाहक-चालक कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, आम्ही तर सेवा देणारच पण लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्या  मांडत राहणार या अनुषंगाने बीड बस स्थानक येथे इंटकचे प्रदेश सचिव बबन वडमारे यांच्या नेतृत्वाखाली बसच्या समोरील काचावर पोस्टर चिटकवून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

बीड एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे  प्रचंड हाल सध्या होत आहेत परमनंट कामगार काढून त्या ठिकाणी  कंत्राटी कामगार भरण्याची प्रक्रिया चालू आहे या सर्व गोष्टी  लक्षात घेऊन  बीड येथे इंटक च्या वतीने मा. गांधी जयंती निमित्त "गांधीगिरी आंदोलन" करण्यात आले यामध्ये कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलना मध्ये बीड डेपोतील कर्मचारी व चालक वाहक उपस्थित होते.

जुलमी परिपत्रके काढून कर्मचाऱ्यावर अत्याचार केला जात आहे तरी पण आम्ही सेवेत कार्यरत राहणार आहोत असं बीडच्या वतीने आज बीड बस स्थानकात आंदोलन करून सांगण्यात आलं. या गांधीगिरी आंदोलनाची जनते  मध्ये चर्चा होत आहे.

बीड

प्रतिनिधी- विश्वनाथ शरणागत

____________

Also see : मित्तल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे जीतो कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट

https://www.theganimikava.com/By-Mittal-Parivar-Lions-Club-of-Poona-Ganeshkhind