राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे भरताना सकारात्मक विचार करण्यात येणार....

राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येणार....

राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे भरताना सकारात्मक विचार करण्यात येणार....
Positive consideration will be given to fill all the clerical posts of government departments in the state through Maharashtra Public Service Commission ....

राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे भरताना सकारात्मक विचार करण्यात येणार....

राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी झाली. आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, गीता कुलकर्णी, सु.मो. महाडीक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलिस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबण्यिात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर होते.

बारामती

प्रतिनिधी- रूपेश महादेव नामदास 

_____