पिंपरीतील जुगार अड्ड्यावर पोलिससांचा छापा; तीन लाख 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त..

जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना अटक केल.....

 पिंपरीतील जुगार अड्ड्यावर पोलिससांचा छापा; तीन लाख 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
Police raid gambling den in Pimpri; Property worth Rs 3 lakh 375 seized

 पिंपरीतील जुगार अड्ड्यावर पोलिससांचा छापा; तीन लाख 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त..

पिंपरी (Pimpri) : पिंपरीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना अटक केले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी तीन लाख एक हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.

अनिता परमानंद तखतवानी (वय 47), परमानंद चतुरमल तखतवाली (वय 48, दोघे रा. पिंपरी), विशाल सांताराम कांबळे (वय 40, रा. डिलक्‍स चौक, पिंपरी), महेश रामचंद कुरेसा (वय 42, रा. पिंपरी मेन बाजार), सचिन जगदीश सौदे (वय 25, रा. विजयनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिता ही महिला जायका चौकाजवळ लपून छपून जुगार अड्डा चालवत होती. याबाबतची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी जायका चौक पिंपरी येथील मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींगमध्ये, दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास छापा टाकला.

पोलिसांनी या कारवाईमध्ये दोन लाख 99 हजार 800 रुपयांची रोकड आणि एक हजार 575 रुपयांचे 35 पत्त्यांचे कॅट असा एकूण तीन लाख एक हजार 375 रुपयांचा ऐवज जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे.

पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी - आत्माराम काळे

______

Also see : बागलाण तालुक्यातील गोळवाड येथे, माझे कुटुंब - माझी जबाबदारी, कार्यक्रमाला सुरुवात

https://www.theganimikava.com/My-family-My-Responsibility-program-begins-at-Golwad-in-Baglan-taluka