कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई कारवाई केली...

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई
Police action against rickshaw pullers in Kalyan station area

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी आज ही काही  नागरिक, रिक्षा टॅक्सी चालक बेजबाबदार पणे विना मास्क तसेच रिक्षा टॅक्सी चालक  प्रवासी बसवताना  सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवताना दिसून येतात. अशा बेजबाबदार  मास्क न घालणारे नागरिक, सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवणारे  रिक्षाचालक, गर्दुल्ले, अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

सायंकाळच्या सुमारास  कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर, इतर पोलीस अधिकारी आणि मोठा कर्मचारी वर्ग कारवाईसाठी रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाला होता. तब्बल दोन तासाहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती. यावेळी एसीपी अनिल पोवार यांनी ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगितले.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

__________

Also see :मुरबाड पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत  मागासवर्गीय लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप 

https://www.theganimikava.com/Distribution-of-literature-to-backward-class-beneficiaries-through-Murbad-Panchayat-Samiti-Social-Welfare-Department