केळवे व माहीम-वडराई समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग, प्लास्टिक बंदी असून ही जिल्ह्यात वारेमाप वापर
पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा सुंदर समुद्र किनारा लाभला आहे, मात्र या किनारी काही दिवसांपासून प्लास्टिकचा कचरा समुद्रातून भरतीच्या पाण्याबरोबर बाहेर येत असून समुद्र किनारी कचऱ्याचे थर साचलेले पहावयास मिळत आहेत.

केळवे व माहीम-वडराई समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग, प्लास्टिक बंदी असून ही जिल्ह्यात वारेमाप वापर
पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. मात्र या किनारी काही दिवसांपासून प्लास्टिकचा कचरा समुद्रातून भरतीच्या पाण्याबरोबर बाहेर येत असून समुद्र किनारी कचऱ्याचे थर साचलेले पहावयास मिळत आहेत. यामुळे किनाऱ्याचे विद्रुपीकरण होत आहे.
पालघर तालुक्यातील माहीम-वडराई किनाऱ्यावर गेल्या आठवड्याभरात प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या, पिशव्या व थर्माकोलचा कचरा जमा झाला आहे. या कचऱ्याचे प्रमाण वाढत असून याचप्रमाणे केळवा चैपाटीवर ही जवळपास दिड किलोमीटर अंतरापर्यंत प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढिग साचलेले पहावयास मिळत आहेत. या बाबत केळवे येथील काही जागरूक नागरिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. यापूर्वी पालघर तालुक्याच्या किनाऱ्यावर डांबराचे गोळी साचले होते. यामुळे केळवे येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या फायबर गोण्यांवर काळा रंग आल्याचे येथील जागरूक नागरिक प्रथमेश प्रभूतेंडुलकर यांनी प्रशासनाच्या निर्दशनाश आणून दिले होते.
मागील आठवड्यापासून समुद्राला मोठी भरती येत असल्याने हा कचरा किनारी लागत आहे. असे केळवे, माहीम व वडराई येथील नागरिकांचे म्हणने आहे. मात्र शासनाने दोन वर्षांपूर्वी राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. याबाबत कठोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद व पालिकेच्या पथकांना उत्पादकांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पथकांव्दारे प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर व विक्रेत्यांवर कारवाई ही करण्यात आली. परंतु आज ही राजरोस प्लास्टिक विक्री बाजारपेठेत होत असून यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला दिसत नाही. आणि यामुळेच समुद्र किनाऱ्यांचा ऱ्हास व विद्रुपीकरण या कचऱ्यामुळे होत आहे, असे नागरिकांचे म्हणने आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
_________
Also see : आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये भारतीय परंपरा आणि विचारानुसार विश्वाचे कल्याण आहे – विवेक देशपांडे