पिंपरी चिंचवड खानदेश मराठा पाटील समाज संघातर्फे दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

विद्यार्थ्यांनी अभ्यासात खूप मेहनत घेऊन नावलौकिक मिळवावे : सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके

पिंपरी चिंचवड खानदेश मराठा पाटील समाज संघातर्फे दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 
Pimpri Chinchwad Khandesh Maratha Patil Samaj Sangha felicitates 10th and 12th class students
पिंपरी चिंचवड खानदेश मराठा पाटील समाज संघातर्फे दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

पिंपरी चिंचवड खानदेश मराठा पाटील समाज संघातर्फे दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

विद्यार्थ्यांनी अभ्यासात खूप मेहनत घेऊन नावलौकिक मिळवावे : सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके

पिंपरी चिंचवड : खानदेश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने दि. 4 ऑक्टोंबर रोजी खान्देशातून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या पाल्यांचा शिवनगरी, बिजलीनगरी याठिकाणी गुणगौरव सोहळा पार पडला.  कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके प्रमुख उपस्थित होते.  विद्यार्थी एक प्रेरणादायी व हुशार होतकरू अभ्यासू संशोधक वृत्तीचा असावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात खूप मेहनत घेऊन आपल्या पालकांचे नाव मोठे करावे व स्वतःही सक्षम व्हावे, असे मत नामदेव ढाके यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे संचालक उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, शंकर पाटील, शिवाजी पाटील, महेंद्र पाटील, प्रल्‍हाद पाटील, कुवर सर, देविदास पाटील, सुनील मराठे, जगदीश पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, विनोद बच्छाव, संदीप पाटील, विजय पाटील, अधिकारी पाटील, देवेंद्र पाटील, वासुदेव पाटील, बाबाजी देसले, भानुदास पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता फक्त दहा विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मंडळाकडे 47 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून उर्वरित विद्यार्थ्यांना घरी जाऊन सत्कार करण्यात येईल, अशी माहिती खानदेश मराठा पाटील समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली. प्रसंगी, श्रुती रवींद्र भदाने (94 टक्के), उत्कर्षा भाऊसाहेब पाटील (93 टक्के), हिमांगी महेंद्र पाटील (92 टक्के), शिवाजी जगदीश पाटील (91टक्के), भावेश रामचंद्र पाटील (87 टक्के), यश किशोर पाटील (86 टक्के), जय ज्ञानेश्वर पाटील, रोहित अधिकार पाटील (85 टक्के), हर्षाली संजय सूर्यवंशी (84 टक्के), वैष्णवी ज्ञानेश्वर पवार (83 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंकर पाटील यांनी मानले.

पिंपरी , पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

_________

Also see :मुरबाड तालुका भाजपा उपाध्यक्ष पदी भास्कर शेठ वडवले यांची निवड ! 

https://www.theganimikava.com/Murbad-taluka-BJP-vice-president-Bhaskar-Sheth-Wadwale-elected