पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...

पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचा पुतळा दहन केला...

पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...
Pimpri Chinchwad Congress activists set fire to a statue of Yogi
पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...
पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...
पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...

पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा...

पुणे पिंपरी : उत्तरप्रदेशातील अत्याचारी हत्याकांडात बळी पडलेल्या स्व.मनिषा वाल्मीकी या मृत पिडीतेच्या घरी जात असताना काँग्रेस चे नेते व खासदार मा. राहूलजी गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारकडून रस्त्यावरच अडवले गेले व राहूलजींना धक्काबूक्की करण्यात आली या प्रकाराचा तीव्र निषेध पिंपरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यां कडून करण्यात आला. 
पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले व निषेध सभे द्वारे वरिल कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी “राहूल गांधी संघर्ष करो हम आपके साथ है” “काँग्रेस पक्षाचा विजय असो” “योगी हमसे डरता है पुलिस को आगे करता है” “भाजपा सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचा पुतळा दहन करण्यात आला.

या प्रसंगी कामगार नेते पुणे जिल्हा इंटक चे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, एन एस यु आय चे  प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डाॅ. वसिम ईनामदार, अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी, पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे 

_______

Also see :  हॉटेल, बार ५ ऑक्टोबरपासून सुरु; सरकारची नवी नियमावली जाहीर

https://www.theganimikava.com/Hotels-bars-starting-October-5-Government-announces-new-regulations