पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढवणार

पाच राज्यांमध्ये सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढवणार
Petrol diesel prices

पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढवणार

Petrol diesel prices increased

पाच राज्यांमध्ये सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

पाच राज्यांमध्ये सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर वाढल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या सध्या तोटा सहन करत आहेत.

पेट्रोलचा दर प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते. त्यामुळे अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झालेली नाही. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते.

मात्र, सध्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार येणार आहे. यापैकी चार राज्यांतील मतदानप्रक्रिया संपली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये आजचा सहावा टप्पा धरून अजून तीन टप्प्यांतील मतदानप्रक्रिया बाकी आहे.

29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर मोदी सरकारकडून इंधन दरवाढीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.