विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप

माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे .

विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप
ParamBir Singh case

विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप

Virar businessman, serious allegations against Pradip Sharma and Parambir Singh

माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे .

क्रिकेट बुकी सोनू जालाननंतर विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांच्यावर आरोप केला आहे. 2017 मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश दिल्याचा आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंगही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारीचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे.

2017 मध्ये पोलिसांनी माझ्या घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

न्यायासाठी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मयुरेश राऊत यांनी पत्र लिहिलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी बंगल्यावर बोलावून प्रकरण समजावून घेतल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे.

क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. 2018 मध्ये परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये उकळले. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.

याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी.