भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत.

भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं
Pandharpur Assembly Election

भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं

5 reasons for the defeat of Bhagirath Bhalke

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला असून पहिल्या फेरीपासून ते 38व्या फेरीपर्यंत त्यांनी प्रचंड टफ दिली आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. तरीही भगीरथ भालके यांचा पराभव का झाला? त्यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती का मिळाली नाही? राष्ट्रवादीची गणितं नेमकी कुठं चुकली? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादीत संभ्रम होता. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. 

भालके यांच्या निधनानंतर भगीरथ यांच्याकडे विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. कारखान्याच्या एकूण 21 पैकी 3 संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला.

भगीरथ यांनी चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या आधी किंवा त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क आला नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे करायला हवी होती. मात्र त्यांनी ते केलं नाही. त्याचा फटकाही त्यांना बसल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. या उलट भाजपचे समाधान आवताडे हे गेल्या काही वर्षांपासून थेट जनतेच्या संपर्कात होते. समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 

निवडणूक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची यंत्रणा अत्यंत तोडकी होती. या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियापासून कॉर्नर बैठकांपर्यंतच्या सर्व प्रचार तंत्रावर जोर दिला होता. त्या तुलनेत आवताडे यांची यंत्रणा कुठेच दिसत नव्हती.

शिवाय परिचारक कुटुंबाने आवताडे यांचा प्रचार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवताडेंसाठी जोरदार बॅटिंग केली. प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे मोजकेच नेते या मतदारसंघात फिरले. उपमुख्यमंत्री अजित पवार उशिराने प्रचारासाठी आले.

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष न येता व्हर्च्युअल सभा घेतली. राष्ट्रवादीकडून केवळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच एक हाती किल्ला लढवला. या मतदारसंघात 15 टक्के धनगर समाज आहे. हा मतदार भारत भालके यांच्याबाजूने होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजात जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी धनगर समाजातील पडळकरांनी क्रेझ दिसून आली.

धनगर समाजातील एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील धनगर नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.