चोरी करून हवेत गोलिबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळल्या

चोरी करून हवेत गोलिबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी अवघ्या चार तासात या तीन चोरट्याना मोठ्या शिताफीने चौकशी करून अटक कली आहे...

चोरी करून हवेत गोलिबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळल्या
चोरी करून हवेत गोलिबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळल्या

चोरी करून हवेत गोलिबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळल्या

 

   मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र. ४८ वर आंबोली येथे असलेल्या आकाश हॉटेलमध्ये गुरुवारी तीन इसम रात्री १:३० वाजताच्या सुमारास जेवणासाठी आले होते. त्यांचे जेवण संपल्यानंतर रक्कम देण्यासाठी बिलकाऊंटर जवळ गेले असता. त्यापैकी एका इसमाने हॉटेलबाहेर जाऊन ते घेऊन आलेल्या ह्युंदाई आय ट्वेंटी कारमध्ये जाऊन बसला आणि कर सुरू केली. याच दरम्यान काऊंटरवर असलेल्या एका इसमाने हॉटेल मालक व व्यवस्थापकावर अग्निशस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडून १ लाख १० हजार रोख रक्कम जबरदस्तीने हिरावून घेऊन चोरी केली. यावेळी हॉटेल मालक व व्यवस्थापकानी आरडाओरडा केला असता तेथे थांबलेल्या ट्रक चालकांच्या सहकार्याने या पळून जाणाऱ्या चोरांना अटकाव करून त्यांच्या गाडीची चावी काढून घेण्यात आली.

मात्र पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यामुळे चोरट्याने या तीन चोरांपैकी एकाने आपल्याकडील अग्निशस्त्राने हॉटेल मालक व व्यवस्थापक यांच्या दिशेने फायरींग केली. आणि या तिघांनी गाडी तेथेच सोडून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पालघर जिल्हा अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पालघर उपविभागीय अधिकारी विकास नाईक, डहाणू उपविभागीय अधिकारी मंदार धर्माधिकारी व बोईसर उपविभागीय अधिकारी विश्वास वळवी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकारची पाहणी करून कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले.

चोरटे सोडून गेलेल्या गाडीच्या आधारे ओळख व इतर पुराव्याच्या आधारे पालघर पोलिसांनी अवघ्या चार तासात या तीन चोरट्याना मोठ्या शिताफीने चौकशी करून अटक कली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर कासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६४/२०२० भा.द.वि.सं. कलम ३९४, ३९७, ३४ सह आर्म ॲक्ट कलम ३/२५ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मसपोनि सिद्धवा जयभाये प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे या करीत असून या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पालघर अधीक्षकांसह १२० अधिकारी व कर्मचारी होते.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

________

Also see : गोदावरीच्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करा

https://www.theganimikava.com/Immediate-panchnama-of-crops-due-to-Godavari-floods-and-heavy-rains