पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट

 पालघर जिल्ह्यात डहाणू व तलासरी तालुक्यातील गावांना गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट
Palghar District Collector visits earthquake prone area
पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट
पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट
पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट

पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भूकंप प्रवण क्षेत्राला भेट

   

 पालघर (palghar) जिल्ह्यात डहाणू व तलासरी तालुक्यातील गावांना गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाचे (earthquake)  धक्के बसत आहेत. काही महिने हे सत्र थांबले होते. परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून हे हादरे पुन्हा बसण्यास सुरुवात झाली असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन दिवसात बसलेल्या भूकंपाच्या (earthquake) धक्क्याने काही घराची परझड झाली आहे. तर अनेक घरांच्या भिंतींना तडा गेल्या आहेत. या बसणाऱ्या भूकंपाचा केंद्र (central) बिंदू धुंदलवाडी येथे असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

या भूकंपाच्या धक्क्याने घरांचे नुकसान तर झालेच आहे. मात्र मागील वर्षी दोघांचा मृत्यू ही झाला आहे. 
      सोमवारी व मंगळवारी सकाळी पुन्हा सकाळपासून भूकंपाचे हादरे जाणवायला सुरुवात झाली असून यामध्ये ५ ते ६ धक्के जाणवल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. तर मंगळवारी सकाळी ९:५० वाजल्याच्या सुमारास बसलेला भूकंपाचा हादरा तीव्र असून तो ३.८ रिष्टरस्केल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या (earthquake) हादऱ्याची तीव्रता कमी जास्त असून या मूळे डहाणू व तलासरी तालुक्यातील हजारो घरांना तडे जाऊन मोठं नुकसान झालंय. तर अनेक घरांच्या भिंती मोडकळीस आल्या असून अनेक भिंतींना लाकडी आधार देण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून येथील नागरिक रात्र जागून काढत आहेत. 

 याबाबत सोमवारी पालघर (palghar) जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी तलासरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात डहाणू व तलासरी तालुक्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी असीमा मित्तल, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे, पोलीस निरीक्षक अजय वसावे आदी उपस्थित होते. तर मंगळवारी या भूकंप प्रवण क्षेत्राची (earthquake prone area) पाहणी पालघरचे (palghar) नवनिर्वाचित जिल्हाधिकारी माणिक गरसल यांनी केली असून नुकसानग्रस्त स्थानिकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल आणि या भूकंप प्रवण क्षेत्राचा विचार करता या ठिकाणी शबरी घरकुल योजने अंतर्गत जास्तीत जास्त घरकुले मंजूर करून ती भूकंप विरोधक बनविण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी आश्वसन दिले.

पालघर

प्रतिनिधी  - राजेंद्र पाटील

________

Also see: गडचिंचले : तत्कालीन प्रभारी अधिकारी बडतर्फ

https://www.theganimikava.com/Gadchinchle-murder-case-to-the-then-officer-in-charge