केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत

केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत
PM cares fund Ventilators

केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत

Working at only 50 percent capacity

केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर  केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे  यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पीएम केयर फंडातून वाटप करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स 50 टक्के क्षमतेनेच चालतात, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शिंदे यांना सांगितले.

ही बाब ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या माध्यमातून उघड झाली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेनुसार चालणारे व्हेटींलेटर प्राप्त झाले आहे की, संपूर्ण राज्यात आणि देशात अशा प्रकारच्या व्हेटींलेटरचा पुरवठा केला गेला आहे, याची शहानिशा केली जावी असे शिंदे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. नेमके किती व्हेंटिलेटर्स पंतप्रधान निधीतून पुरविले गेले आहेत, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते असेही शिंदे यांनी सांगितले.

नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी व्हेंटिलेटर्स रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासन इतक्या हलगर्जीपणाने कसे वागू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे.

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.

केंद्र सरकारने नाशिकसाठी व्हेंटिलेटर तर पाठवले, मात्र व्हेंटिलेटर जोडण्यासाठी लागणारे आवश्यक सुटे पार्ट्स कनेक्टर सोबत पाठवण्यातच आले नाही. हे सुटे पार्ट मिळालेच नसल्याने पाठवलेले 60 व्हेंटिलेटर्स  धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे शहरात एकीकडे एका एका व्हेंटिलेटरसाठी रुग्ण तडफडत आहेत. असं असताना तब्बल 60 व्हेंटिलेटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे पडून असल्याचं बघायला मिळत आहे. या घटनेतून एकूणच केंद्रातील प्रशासनाचा अर्धवट कारभाराचा पर्दाफाश झालाय.

व्हेंटिलेर्सची ही दुरुवस्था आणि प्रशासनाची अनास्था पाहून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही आमच्या घरातील सदस्यांना गमावत असताना सरकार व्हेंटिलेटरही उपलब्ध करुन देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

तसेच सरकारने आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा आणि औषधं तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत अशीही मागणी होत आहे