सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय
PM Narendra Modi news

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरिप हंगांमाच्या पार्श्वभूमीवर किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे.(3 big decisions of Modi government to give relief to common people)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे.

भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी जाहीर करण्यात आली आहे. सर्वात कमी एमएसपी मका पिकाची वाढली आहे. मका पिकाची एमएसपी 1850 वरुन 1870 वर गेली आहे.प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत रेल्वे संदेशवहनासाठी 2G स्पेक्ट्रम वापरत होते. आता रेल्वेला 700 मेगा हर्टझ बँड दिला जाईल. रेल्वेला या निर्णयाचा फायदा होईल आणि सुरक्षा यावर फरक पडेल, असं सांगण्यात आलं आहे. अत्याधुनिक स्पेक्ट्रमच्या वापरामुळं रियल टाईम कम्युनिकेशन होणार आहे.


2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर नव्यानं स्थापन होणाऱ्या खतनिर्मिती कंपनीला अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार तेलंगाणातील रामगुंडम फर्टिलायजर आणि केमिकल फॅक्टरी स्थापन झाली आहे.(3 big decisions of Modi government to give relief to common people)

या धोरणानुसार रामगुंडम खतनिर्मितीला कंपनीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे