टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे.

टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
PM Narendra Modi

टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

After the meeting of the task force, Prime Minister Modi is preparing to take a big decision

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. 

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन  करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी  आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यात राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) आणि मुंबई(2.02 टक्के) यांचा समावेश आहे.

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. 

भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.तर दुसऱ्या बाजूला भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3,00,732 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 इतकी झाली आहे.