कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे.

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे.
PM Narendra Modi

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे.

Corona is testing her patience

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 

नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असं ते म्हणाले. कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे. राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करतानाच केंद्र सरकार भविष्यामध्येही कोरोना लसीकरणाचा मोफत कार्यक्रम सुरु ठेवेल. राज्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारे कोरोनाची भीती निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट तज्ज्ञांना मन की बातमध्ये पाचारण केलं. तसेच त्यांना देशावासियांशी संवाद साधायला लावला. मुंबईतील लिलावती रुग्णालयाती प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी, श्रीनगरचे डॉ. नाविद यांना जनतेशी संवाद साधायला संधी दिली. तसेच रुग्णवाहिका चालवणारे, कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या गृहिणींचाही देशवासियांशी संवाद साधून दिला. 

यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालकांचंही कौतुक केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी धन्यवादाची भावना आहे, असं ते म्हणाले.