राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत......

राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन
पाणी पुरवठा (water supply) व स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मिशनसाठी ग्रामीण पाणी पुरवठा (water supply) आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निवड झालेल्या स्पर्धकास पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी पालघर (palghar) जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले.
बोधचिन्ह ग्रामीण पाणी पुरवठा (water supply) आणि ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल असा असावा. ब्रिदवाक्य मराठीतूनच व मोजक्या शब्द मर्यादेत असावे. या स्पर्धेत चित्रकार व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.बोधचिन्ह (Logo) एकरंगी , बहुरंगी प्रकारात असला तरी चालेल. सहभागींनी लोगोची (Soft Copy)पाठविणे आवश्यक असेल. त्यासोबत स्पर्धकाची संपूर्ण माहिती उदा. पत्ता, संपर्क क्रमांक, ई - मेल आयडी इ. असणे आवश्यक असेल. लोगो अंतिम करण्याचे संपुर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला आहेत. स्पर्धेतील सहभागींनी लोगोची ( Soft Copy) directorwsso@gmail.com , iecwsso@gmail.com व sbmzppalghar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्यात यावी. ज्या सहभागीचे बोधचिन्ह आणि बोधवाक्य यांची अंतिम निवड होईल त्यांना रूपये 50 हजार एवढी रक्कम बक्षीस स्वरूपात राज्यस्तरावरून देण्यात येईल.दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत जिल्हातून प्रवेशिका राज्यस्तरावर पाठविण्यात यावे. आपल्या जिल्ह्यातून या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी आपल्या तालुक्यातील कलाकार, विद्यार्थी, विविध प्रकारच्या संस्था, चित्रकार यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदर पालघर यानी केले आहे.
सफाळे पालघर
प्रतिनिधी- रविंद्र घरत
_________
Also see : सफाळा पोलीसांकडून पोलीस पाटील यांच्या "कंन्येचा" गौरव.
https://www.theganimikava.com/glory-police-patils-daughter-by-safala-police