केंद्र शासन व ठाणे महापालिका यांच्या वतीने मोदीजींच्या पंतप्रधान पथविक्रे आत्मनिर्भर निधी योजना शिबिराचे आयोजन
भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर निधी योजना शिबिर राबविण्यात आले

केंद्र शासन व ठाणे महापालिका यांच्या वतीने मोदीजींच्या पंतप्रधान पथविक्रे आत्मनिर्भर निधी योजना शिबिराचे आयोजन
भाजपा ठाणे (thane) शहर जिल्हाध्यक्ष व आमदार श्री.निरंजन डावखरे साहेब आणि आमदार श्री.संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.(4ब) स्थानिक नगरसेविका सौ.स्नेहा आंब्रे व भाजपा ठाणे (thane) शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री.रमेश आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली ही शिबीर राबविण्यात आली होती. या शिबिराच्या (camp) माध्येमातून कोरोनाच्या (corona) टाळेबंदी मुळे शहरातील पथविक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या (Prime Minister Path Vikreta Aatm Nirbhar Nidhi Yojana) माध्येमातून पथविक्रेत्यांना बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल एक वर्षाच्या परत फेड मुद्दतीसह रुपये 10, 000 हजार कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर कर्जावर 8 ते 10 टक्के व्याज सरकार भरणार आहेत. फक्त एक ते दोन व्याज लाभार्थीला भरावा लागणार आहे. या माध्यमातून छोटया छोटया लघु उधोगधंद्यांना चालना मिळेल असे यावेळी रमेश आंब्रे यांनी सांगितले. ह्यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंब्रे, नगरसेविका सौ. स्नेहाताई आंब्रे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते राजेश सावंत, अश्विन शेट्टी, कृष्णा यादव, संदीप माने, वर्षा माने, प्रशांत मोरे, दिनेश बनसोडे, अक्षय शिंदे, सागर कदम, मनिष हाटांगले, दिनेश रसाळ उपस्थित होते. स्थानिक पथविक्रेत्यांनी मोठया संख्येने लाभ घेतला सर्वांनी नगरसेविका सौ. स्नेहाताईंचे आभार व्यक्त केले आहे.
ठाणे
प्रतिनिधी - सत्यवान तरे
_______
Also see : कोविड रूग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य
https://www.theganimikava.com/Empire-of-unsanitary-conditions-at-Kovid-Hospital