सुजलाम सुफलाम उत्तर महाराष्ट्रासाठी जल परिषद संपन्न
उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला हवा यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची सभा ऑनलाइन संपन्न झाली...

सुजलाम सुफलाम उत्तर महाराष्ट्रासाठी जल परिषद संपन्न
कल्याण (kalyan): उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला हवा यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची सभा ऑनलाइन संपन्न झाली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे उपस्थित होते. तर कृषी भूषण, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त विश्वासराव शेळके हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्राची भूमी सुजलाम- सुफलाम करून तिला गतवैभव प्राप्त करून, पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवणे या उदात्त हेतूने सर्वांनी एकत्र येऊन जलक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निरपेक्ष हेतू जल परिषदेचा असल्याचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
पावसाचे पाणी अडविले नाही तर ते जिरणार नाही. त्यासाठी जलसंधारण झाले पाहिजे व वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबवून योग्य व्यवस्थापन करण्याची आज गरज आहे. उत्तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. आता राज्यकर्त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकसहभागातून लोक चळवळ उभारण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. आपण सर्व एकत्र येऊन काम केल्यास निश्चितच यश येईल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.
कृषिभूषण, कृषिरत्न विश्वासराव शेळके यांनी भविष्यकाळात पाणी प्रश्न फार गंभीर होणार आहे त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील समर्पित भावनेने काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन पाणी प्रश्नावर मोठा लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे, आपल्या गावाचा ग्रहण पाणीप्रश्न लोकसहभागातून, प्रशासनाच्या मदतीने कसा सोडवला इत्यादी विषयी माहिती दिली.
सदर सभेसाठी जल परिषदेचे नरेंद्र पाटील, डॉ. धननंजय नेवाडकर, विश्वासराव देवरे, विश्वासराव भोसले, निखिल पवार, हेमंत चव्हाण, दिलीप बोरसे, रवींद्र भालेकर, देवदत्त बोरसे, दिलीप सोनवणे, प्रकाश माळी, विनोद शेलकर, मगन सुर्यवंशी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कल्याण,ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
____________
Also see : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न
https://www.theganimikava.com/District-level-Adarsh-Shikshak-Gunagaurav-ceremony-held