धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने एकत्र आले तरच समाजाच्या पदरी आरक्षण पडेल-दत्ता वाकसे

बीड राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाजाच्या आरक्षणाचा वनवा पेटताना दिसत आहे परंतु प्रत्येक नेतृत्व आपापल्या पद्धतीने आपल्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभा करत आहे.

धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने एकत्र आले तरच समाजाच्या पदरी आरक्षण पडेल-दत्ता वाकसे
Only if all the leaders of the Dhangar community come together will there be reservation for the community - Datta Wakse

धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने एकत्र आले तरच समाजाच्या पदरी आरक्षण पडेल-दत्ता वाकसे

बीड: बीड राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाजाच्या आरक्षणाचा वनवा पेटताना दिसत आहे परंतु प्रत्येक नेतृत्व आपापल्या पद्धतीने आपल्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभा करत आहे. परंतु त्यामुळे मात्र  महाराष्ट्र सरकारवर दबावतंत्र निर्माण होताना दिसत नाही त्यामुळे राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धनगर समाजाच्या आरक्षणाची हाक दिली तर नक्कीच महाराष्ट्र सरकारवर दबावगट निर्माण होईल आणि त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गामध्ये दिसेल त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या सर्व संघटना सर्व राजकीय नेतृत्वाने एकत्र येऊन आंदोलनाची दिशा देण्याची गरज आहे.अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिले आहे. पुढे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कोटीच्या जवळपास असलेल्या धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने आणि सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या राजकारणापायी  धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये धनगर समाजाने स्वतःच्या पतदरामध्ये आरक्षण नावाची गोष्ट पाडून घ्यायची असेल तर एकसंघ येऊन गळ्यात गळा आणि हातात हात घेऊन संघटनात्मक सर्वसमावेशक आंदोलन उभारले तर राज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्रामध्ये सरकार पाडण्याची  ताकद धनगर समाजामध्ये आहे. परंतु विविध संघटनांच्या माध्यमातून धनगर समाज  विखुरला गेलेला आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारवर दबावगट निर्माण होत नाही आणि त्यामुळे सरकार धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचे काम करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षातील सर्व संघटनातील नेतृत्वाने एकत्र येऊन राज्यभर धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली तर राज्यातील सर्व युवक रस्त्यावरून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम करतील त्यामुळे आगामी काळात धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वांनी एकत्र येऊन एकसंघ होऊन आंदोलनाची दिशा दिली तर राज्यामध्ये वनवा पेटल्या शिवाय राहणार नाही असे देखील वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार-खासदार राज्य कार्यकारिणी सदस्य असलेल्या धनगर समाजाच्या नेतृत्वाकडून धनगर समाजाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे त्यामुळे धनगर समाजाच्या युवकांनी त्यांना जाब विचारावा की सन 2014 सली आपण धनगर समाजाला लेखी आश्वासन दिले होते की राज्यांमध्ये आमचे सरकार आले की धनगर समाजाच्या एसटी  अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करू परंतु तशा प्रकारची कुठलीही हालचाल पाच वर्षाच्या काळामध्ये केली नाही परंतु आता त्यांना धनगरांचा एवढा कळवळा का आला..?  असे देखील वाकसे यांनी म्हटले आहे.

बीड

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

__________

Also see :सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला...

https://www.theganimikava.com/Funding-from-the-Department-of-Social-Justice