टपाल सप्ताह समारोह दिना निमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव संपन्न
टपाल सप्ताह समारोह दिना निमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव संपन्न प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला...
टपाल सप्ताह समारोह दिना निमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव संपन्न
बीड : जागतिक महामारी कोरोनाने संपूर्ण जगभर व देशभर थैमान घातले असताना बीड डाक कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता डाक विभाचे काम अविरतपणे चालू ठेवले व तसेच पोस्टल कर्मचाऱ्यांच्या वर्गणीच्या माध्यमातून एक लाखाचा वर्गणी जमा करून गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप केले याची दखल कार्यरत कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय (डाक) पोस्ट सेवेत कार्यरत असलेले आंबेजोगाई येथील ग्रामीण डाक सेवक अनंत कसबे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला यांना या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये बीड येथे कार्यरत असलेले अमरसिंह ढाका, प्रल्हाद हातागळे दीपक कुडके, महेश जगताप, कृष्णा गुजर, शिवाजी खेडकर, अधिकारी कर्मचारी यांचा गुण गौरव करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे डाक विभागाचे चिफ पोस्टमास्तर जनरल मुंबई यांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र, पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
भारतीय पोस्टल कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्यभावाची दखल घेतली गेली ,महाराष्ट्र गोवा पोस्ट विभागाच्यावतीने बीड येथे विपरीत व विषम परिस्थिती मध्ये पोस्टल (डाक) कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जनतेची सेवा केली आहे, भारतीय पोस्ट महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या वतीने करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाक अधिक्षक श्यामसुंदर शास्त्री औरंगाबाद विभागाचे सहायक डाक अधिक्षक आस.आर.पाठक,एम.एन.वांगे,आर.यु.नेहरकर, डाक निरीक्षक सुनील नाटकर,भावत मुंडे, बाबुरव धनवडे, महारुद्र खरपडे, अशोक मुंडे, विशाल अगवान, एस.पी सातपुते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गरजे तर आभार बाबासाहेब मोरे यांनी मानले.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
____________
Also see : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार