महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'आयसीएआय'तर्फे स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप

महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'आयसीएआय'तर्फे स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले...

महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'आयसीएआय'तर्फे स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप
On behalf of ICAI on the occasion of Mahatma Gandhi Jayanti Sanitation Campaign Distribution of school materials

महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'आयसीएआय'तर्फे
स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंत्रप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व 'आयसीएआय'च्या वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या वतीने स्वच्छता अभियान व १०० गरजू व होतकरू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार व सचिव सीए काशिनाथ पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे 'आयसीएआय'चे उपाध्यक्ष आणि 'विकासा'चे अध्यक्ष सीए समीर लड्डा यांच्या नेतृत्वात हे दोन्ही उपक्रम पार पडले. 

स्वारगेट बस स्थानक परिसरात 'आयसीएआय'च्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. परिसर झाडून घेत, कचरा गोळा केला. तसेच स्थानक परिसरात उपस्थित लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी 'विकासा'चे उपाध्यक्ष मन्मथ शेवाळकर, खजिनदार श्रावण लड्डा, संपादक अनुजा तोष्णीवाल, सदस्य संकेत गुजलवार, पूजा पाटील, अनुराधा गंभरे, दशरथ धागे, रवींद्र पाटील, सुरेश राठोड आदी विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. लोकविकास मंडळाच्या माध्यमातून राजीव गांधी वसाहत, भोईटे चाळ, पडळ वस्ती, वैदूवाडी, पाटील वस्ती, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन वस्ती येथील १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये लोकविकास मंडळाचे अरुण निमकार्डे, अमेय करमाळकर, मुग्धा वाड यांचे सहकार्य लाभले.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके

__________

Also see : निगडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील स्मार्टसिटीच्या कामांची पाहणी

https://www.theganimikava.com/Inspection-of-Smart-City-works-at-Nigdi-Pimple-Gurav-Pimple-Saudagar