पैलवान सुशील कुमार विरोधात ठोस पुरावे

CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे.

पैलवान सुशील कुमार विरोधात ठोस पुरावे
Olympic medalist wrestler Sushil Kumar

 पैलवान सुशील कुमार विरोधात ठोस पुरावे

Solid evidence against wrestler Sushil Kumar

CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात दिल्ली पोलिसांची छापेमारी सुरुच आहे. पोलिसांनी आरोपींचा पत्ता सांगणाऱ्यांना इनामही जाहीर केलयं. अशावेळी सुशील कुमारच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत.

कारण फॉरेन्सिक सायन्स लॅबने आपल्या अहवालात मोबाईलमधील व्हिडीओ फुटेज योग्य असल्याचं सांगितलंय. या व्हिडीओमध्ये सुशीलकुमार आपल्या साथीदारांसह सागर राणाला मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. 


छत्रसाल स्टेडियमच्या CCTV फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर धनखड आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आलाय. या CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबने हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलंय.पैलवान सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर मानसिक दबावाखाली येतील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याच वेळी, अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या इनामाची घोषणा केली होती. तर त्याचा साथीदार अजयविषयी माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचे इनाम मिळणार आहे.सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये  झालेल्या वादावादीनंतर पैलवानांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या 23 वर्षीय सागर राणा या पैलवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिस सुशील कुमारसह वीस आरोपींच्या मागावर आहेत. यापैकी काही जणांना रोहतकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी सुशील कुमारचा निकटवर्तीय भुरानेच हरिद्वारमधील एका योगगुरुच्या आश्रमापर्यंत आपण सुशीलला सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दैनिक जागरण या वृत्तपत्राने यासंबंधी बातमी दिली आहे.

भुराच्या कबुलीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. भुरा पोलिसांची दिशाभूल तर करत नाही, याचा तपास केला जात आहे. भुरा पैलवानी करत असून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचा खास मित्र आहे. याशिवाय भूपेंद्र आणि अजयही सुशीलचे जीवलग आहेत. अजयचे वडील काँग्रेस नगरसेवक असल्याचा दावा केला जातो. तर भूपेंद्र विरोधात फरिदाबादमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.

छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी उशिरा कुस्तीपटू सागर राणाची हत्या केल्यानंतर सुशील कुमार आणि इतर पैलवान वेगवेगळ्या ठिकाणी लपले, असा दावा भुराने केला आहे. यानंतर प्रत्येकाने दिल्लीतून पळून जाण्याची योजना आखली आणि त्यासाठी सुशीलने भुरालाही बोलावलं होते. तो सुशीलला योगगुरुच्या हरिद्वारमधील आश्रमापर्यंत सोडून आला.

यानंतर, भुरा परत आला आणि सुशीलने त्याचे सर्व फोन बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सुशीलचे शेवटचे मोबाईल लोकेशनही हरिद्वारमधील सापडले आहे.