वन विभागामध्ये चालू असलेली अवैद्य कामे लपवण्यासाठी अधिकारी घेतात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे

उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री ,वनमंत्री पोलीस आयुक्तांन मुख्य मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार...

वन विभागामध्ये चालू असलेली अवैद्य कामे लपवण्यासाठी अधिकारी घेतात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे
Officials use the names of journalists and social activists to cover up illegal activities in the forest department

वन विभागामध्ये चालू असलेली अवैद्य कामे लपवण्यासाठी अधिकारी घेतात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे

उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री ,वनमंत्री पोलीस आयुक्तांन मुख्य मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई विभागातील वनाधिकारी आपले गोरख बंदे लपवण्यासाठीपत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या चे नावे घेऊन बदनाम करून जीवितास धोका निर्माण करण्याचे षडयंत्र रचत आहेत या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मंत्री संजय राठोडमुंबई पोलीस आयुक्त, मुख्य वनसंरक्षक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणारे व महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच रिपाइं नेते संजय बोर्डेत्यांच्याविरोधात खूप मोठे षड्यंत्र वनविभागाचे अधिकारी रचत आहेत.

या विषयावरती अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे . परंतु अद्याप काही कारवाई झालेली नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील विभागातील कार्यरत असणारे वनाधिकारी अंकुश पवार व त्यांचे सहकारी हे अवैध धंद्यांना प्रोत्साहन देतात ज्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या बांधण्यासाठी पैसे घेतात या ठिकाणी चोरीची लाईट चालू आहे या ठिकाणी पाणी विक्री होते  ते धंदे या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे चालतात. एक पत्रकार असल्याने व प्रतिष्ठित नागरिक असल्याने संजय बोर्डे या विरोधात आवाज उठवत असतात . यातच राग मनात धरूनवनाधिकारी काही दलालांना व महिलांना हाताशी धरून संजय मुंडे यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत व बदनामी करत आहेत यामुळे बोर्डे यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून याच्या सेवेमध्ये किती कामे झाली किती किती चौकशा झाल्या   किती पाणी चोरी,  वीज चोरी अनधिकृत जनावरे यांना अभय दिले होते याची चौकशी करून त्यास निलंबित करण्यात यावे.तसेच या विभागात वनाधिकाऱ्यांची खूप दहशत आहे म्हणून त्यांच्या विरोधात कोणी आवाच उचलत नाही. याविषयी तक्रार करण्यात आलेले आहे. या अधिकाऱ्यावर प्रशासन विभाग कोणते कार्यकर्ते हे बघायच आहे.

मुंबई

प्रतिनिधी -संजय बोर्डे

________

Also see : सख्ख्या भावांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू

https://www.theganimikava.com/Two-brothers-were-crushed-by-the-truck-both-of-them-died-on-the-spot