श्वेता बिडवी यांनी स्वीकारला पदभार

पडघा ग्रामपंचायतीच्या नवनिवार्चित उपसरपंच श्वेता बिडवी यांनी स्वीकारला पदभार

श्वेता बिडवी यांनी स्वीकारला पदभार
Newly elected Deputy Panch of Padgha Gram Panchayat Shweta Bidvi accepted the post

पडघा ग्रामपंचायतीच्या नवनिवार्चित उपसरपंच श्वेता बिडवी यांनी स्वीकारला पदभार

 भिवंडी तालुक्यातील वाढत्या नागरीकरणाने चर्चेत असलेल्या पडघा  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा पदभार श्वेता बिडवी यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थित स्विकारला पदभार.

शिवसेना मनसे युतीतून उपसरपंचपदी निवड झालेल्या मनसेच्या श्वेता बिडवी यांना पदभार देण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम पढगा ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी घेण्यात आला. यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी.के.म्हात्रे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोपतराव, जिल्हा सचिव राकेश वारघडे, भिवंडी ग्रामीण विधानसभा सचिव रवींद्र विषे, शिवसेना शाखा प्रमुख अमोल बिडवी, माजी सरपंच व विध्यमान सदस्य डॉ. संजय पाटील सुगंधा पारधी, मनोहर आरज, जोती जाधव, गुरुनाथ मोरे, पंचायत समिती माजी सदस्य सुरेश पारधी, रोहिदास पाटील, गुरुनाथ मते, किरण क्षीरसागर उपस्थित होते.

उपस्थित शिवसेना मनसेच्या पधाधिकाऱ्यानी व मान्यवरांनी पदभार स्वीकारल्या नंतर उपसरपंच श्वेता बिडवी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

भिवंडी, ठाणे

प्रतिनिधी  - सत्यवान तरे

____

Also see : JEE आणि NEET परीक्षेसाठी उत्तम प्रयत्न करा : मायावती

https://www.theganimikava.com/do-your-best-for-jee-and-neet-exams-says-bsp-suprimo--mayavati