माकुणसार खाडीवरील पुलाची नव्याने उभारणी, पर्यायी मार्गाची दैनीय अवस्था
पालघर जिल्ह्यातुन जाणारा नियोजित झाई-बोर्डी-रेवस रेड्डी या सागरी महामार्गत येणाऱ्या माकुणसार खाडीवरील पूलाच्या मजबुतीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते.
माकुणसार खाडीवरील पुलाची नव्याने उभारणी, पर्यायी मार्गाची दैनीय अवस्था
पालघर (palghar) जिल्ह्यातुन जाणारा नियोजित झाई-बोर्डी-रेवस रेड्डी या सागरी महामार्गत येणाऱ्या माकुणसार खाडीवरील पूलाच्या मजबुतीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु या पुलाचा पाया पूर्णतः जीर्ण झाल्याने या पुलाचे नूतनीकरणाचे व फेर बांधणीचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. हे पूल २०२१ पर्यंत पूर्णत्वास येईल अशी माहिती पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
माकुणसार खाडीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या या पुलाची लांबी १४० मीटर असून एकूण २० मीटर लांबीची सात गाळी आहेत. या पुलाचा जुना पाया जीर्ण झाल्याने तो पूर्ण काढून पुलाचे नवीन काम करण्यात येत आहे. यासाठी अडीच कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात येणार असूनपुलाच्या पहिल्या गाळ्याचे काम पूर्णत्वास येण्यासाठी ठेकेदाराचे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्याभरात या गाळ्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे. या साडेसात मीटर रुंदीच्या पुलावर तीन गर्डर बसविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर यामध्ये आरसीसी संरक्षक भिंत बांधकाम व जोड रस्त्याचे काम ठेक्याअंतर्गत असून खाडीला येणाऱ्या भरती ओहटीमुळे पुलाचे काम करण्यात काही अडचणी येत असल्याच्या सूत्रांनी सांगितले.
सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक केळवा-दांडी-तिघारे या राज्यमार्गाने पर्यायी वळविण्यात आली असून हा रस्ता मुळातच अरुंद आहे. तसेच या मार्गावरून सफाळ्याकडे होणारी अवजड वाहनांची येजा त्यामुळे खटाली गावच्या तलावाजवळ हा रस्ता खचला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. या मार्गाने निदान एक वर्ष तरी अवजड वाहने व महामंडळाच्या बसेस ये-जा सुरू राहणार आहे. यामुळे हा मार्ग वाहतूकीला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केळवे खटाली येथील नागरिकांनी केली आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
________
Also see : पोस्टाच्या 'फाईव्ह स्टार व्हिलेज' उपक्रमाची सुरुवात वाडा तालुक्यातील कंचाड गावात