नविमुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पांनमसाला सह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त.

नविमुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत ३६ लाख रुपयांच्या गुटखा पान मसाला व गाड्यासह सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

नविमुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पांनमसाला सह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त.
NaviMumbai police seize goods worth Rs 50 lakh along with gutka and panna masala worth Rs 36 lakh
नविमुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पांनमसाला सह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त.

नविमुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पांनमसाला सह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त

नविमुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत ३६ लाख रुपयांच्या गुटखा पान मसाला व गाड्यासह सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहिती प्रमाणे दि. ९-१०-२०२० रोजी रबाळे MIDC परिसरातील हॉटेल सिल्वर की याठिकाणी ४ आरोपीना अटक करण्यात आली या कार्यवाही दरम्यान  ३५, ५३, ३१२ रुपये किंमतीचा पान मसाला व गुटखा, ८ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, ४ लाख रुपये किमतीची १ बोलेरो पिकअप, २ लाख रुपये किमतीची इको व्हॅन. जप्त करण्यात आली असून -

१. जितेंद्र दास. वय २६

२. आखाया खंडा. वय २२

३. प्रियव्रत दास. वय २९

४. मुन्ना यादव. वय २८

अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर २२४/ २०२०. भादवी १८८,२७२,२७३,३२८,३४ सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहीबीशन अँड रिस्ट्रिक्षण ऑन सेल २०११ नुसार) शिक्षा सुनावली असून मा. न्यायालयाने आरोपीना १२-१०-२०२० पर्यंत रिमांड मंजूर करण्यात आला आहे, 
उपरोक्त कार्यवाही पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिह, पोलीस सह आयुक्त जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली व वपोनी. रवींद्र बुधवन्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, वपोनी, एन बी कोल्हटकर, सपोनि विनया परासुर, राजेश गज्वल, पोलीस अंमलदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इक्बाल शेख, बाबा संगोलकर, योगेश नाईक, संजय चौधरी, उमेश उटगीकर, आतिष कदम, विष्णू पवार,  राहुल वाघ, बाबू सरफरे, मेघनाथ पाटील, राजेश मोरे, व सचिन टिके यांनी सदर कामगिरी केली.

नविमुंबई

प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे

_________

Also see : ऊस तोडणी व वाहतूक कामगार यांच्या दरात वाढ करा - मोहन जाधव

https://www.theganimikava.com/Increase-the-rates-of-sugarcane-harvesters-and-transport-workers--Mohan-Jadhav