नवी मुंबई येथून अपहरण झालेल्या दोन बालकांचा अनैतिक वाहन प्रतिबंध कक्ष व गुन्हे कक्ष यांच्याकडून कारवाई
नवी मुंबई येथून अपहरण झालेल्या दोन बालकांचा अनैतिक वाहन प्रतिबंध कक्ष व गुन्हे कक्ष यांच्याकडून कारवाई

नवी मुंबई येथून अपहरण झालेल्या दोन बालकांचा अनैतिक वाहन प्रतिबंध कक्ष व गुन्हे कक्ष यांच्याकडून कारवाई
नवी मुंबई तळोजा येथील केंद्र गावातून दिनांक 8 जुलै 2016 रोजी एका दहा वर्षाच्या मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले होते याबाबत तळोजा पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच तळोजा पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी एका सतरा वर्षाच्या मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवण्याचा गुन्हा तळोजा पोलीस ठाणे नवी मुंबई येथे नोंद करण्यात आला होता.
वर नमूद केलेल्या दोन्ही गुन्ह्यांमधील अपहरण बालकांचा मा. वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून कसून शोध घेत असताना अपहरण झालेला मुलगा हा जिल्हा उडपी कर्नाटक येथील सुधारगृहात असल्याचे माहिती मिळाली ताबडतोब या माहितीच्या आधारे अपहरण झालेल्या मुलास बाल कल्याण समिती जि. उडपी कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच तळोजा मधील सतरा वर्षे मुलीच्या अपरणा मध्ये संशेहित इसम नामे अजय पांडे घेऊन गेला असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा मोबाईल नंबर तांत्रिक तपास करून नमूद अपहरण झालेली मुलगी व संशेहीत इसम या दोघांना सेक्टर 26 फेस 2 तळोजा नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे
सदरची कारवाई मा. पोलीस उपायुक्त सो गुन्हे शाखा तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन गरड, सपने सुनिता भोर, पो हवा 744/विठ्ठल सापते, पोना 1997/विकास जाधव, पोना 2440/किरण पाटील, चालक व हवा 972/पवार यांनी केली