नवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

नवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

नवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

नवी मुंबई : सीमारेषेवर भारत-चीन चाललेल्या लष्करी वादात चीन जाणिवपूर्वक कुरापती काढत असल्याचे सांगत नेरूळ सेक्टर दोनमधील कॅाग्रेस कार्यालयासमोर नेरूळ तालुका कॉंग्रेसच्या वतीने चीनचा झेंडा जाळून आपला निषेध व संताप व्यक्त केला. यावेळी शहीद जवानांना मेणबत्ती लावून श्रध्दाजंली वाहण्यात आली.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत व कॉंग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र सावंत यांच्यासमवेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, विजय कुरकुटे,चंद्र कांत माने प्रकाश देसाई, महेश भोईटे, रवींद्र सरडे, पतंगराव कोडग, उत्तम पिसाळ, तानाजी जाधव, गोविंद साटम, संग्राम इंगळे, तुषार पाटील, दिघे, निकम, तळेकर, वासंती पुजारी,नीलम अडविलकर ,यांच्यासह स्थानिक रहीवाशीही या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी चीनचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला.