8 ऑक्टोंबरला बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत राष्ट्रव्यापी आंदोलन
मा. वामन मेश्रामसाहेब, राष्ट्रीय संयोजक, बहुजन क्रांति मोर्चा यांच्या आदेशानुसार बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराच्या मुदयांवर चार टप्प्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

8 ऑक्टोंबरला बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत राष्ट्रव्यापी आंदोलन
मा. वामन मेश्रामसाहेब, राष्ट्रीय संयोजक, बहुजन क्रांति मोर्चा यांच्या आदेशानुसार बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराच्या मुदयांवर चार टप्प्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ०३ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश मधील संपूर्ण जिल्ह्यात धरणे व प्रदर्शन, दुसऱ्या टप्प्यात 8 ऑक्टोंबर ला संपूर्ण भारत देशात धरणे व प्रदर्शन, तिसऱ्या टप्प्यात 15 ऑक्टोबरला संपूर्ण भारत देशात रॅलीचे आयोजन, आणि चौथ्या टप्प्यात 22 ऑक्टोंबरला उत्तर प्रदेश राज्य बंद
8 ऑक्टोंबर ला संपूर्ण भारतात एकाच दिवशी राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आली आहे या आंदोलनात बहुजन समाजातील महिला आणि बहुजन बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन क्रांती मोर्चा संयोजक समिती सांगली जिल्हा यांनी केले आहे
बहुजन क्रांती मोर्चा सांगली जिल्हा
सांगली
प्रतिनिधी - जगन्नाथ सकट
__________
Also see : गोड साखरे मागील कडू कष्ट...
https://www.theganimikava.com/Bitter-bitterness-behind-sweet-sugar