नाशिक जिल्हा  सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर 

देशमुख गटाची सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अशोक बागूल तर उपाध्यक्ष पी.के.चव्हाण, एच.के.पवार यांची निवड

नाशिक जिल्हा  सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर 

   

  नाशिक जिल्ह्यातील  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या एन.डी.एस.टी. सोसायटीत काही विद्यमान संचालकांनी गैरव्यवहार केल्या प्रकरणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघात फूट पडून एस.बी.देशमुख,एस.के. सावंत यांचा एक गट तर आर.डी.निकम,गुलाबराव भामरे,यांचा एक अशी उभी फूट पडून दोन गट झाले आहेत.
    यात देशमुख व सावंत गटाची सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे.यात सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी ए.जे.बागूल (खोकरी-उं.), तर उपाध्यक्षपदी पी.के.चव्हाण (सुरगाणा) व एच.के.पवार ( काठीपाडा) यांची, तर कार्याध्यक्ष म्हणून सी.के.झिरवाळ (उंबरठाण), कार्यवाह के.एल.वाकचौरे (अलंगुण), सहकार्यवाह आर.जी.पवार (गुही), कोषाध्यक्ष पी.के.कापडणीस (आमदा-प), सहकोषाध्यक्ष एस.एस.पवार (उंबरठाण), अंतर्गत हिशोब तपासणीस ए.एस.चौधरी (करवंदे), महिला प्रतिनिधी श्रीमती ए.बी.अहिरे (म्हैसखडक), श्रीमती एन.जी.जाधव ( काठीपाडा), विद्यासचिव आर.जी.पवार (शिंदे-दिगर), एम.एस.व्यवहारे (बा-हे), लेखापाल एस.पी.राठोड (चिंचला), तालुका प्रवक्ता संजय वाघ (बोरगाव), तर तालुका सदस्य म्हणून के.आर.सहारे (पांगरणे), स्टिफन घोसाळ (आंबाठा), डी.डी.खैरनार (भवाडा), ई.वाय.गावित (श्रीभूवन), एच.जी.वाडू (भेगू) आदींचा समावेश तालुका कार्यकारिणीत आहे. 
   सदर निवड एकमताने केली असून सूचक व अनुमोदन अशा नियमांचे पालन करून करण्यात आली आहे. ही बैठक प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खोकरी (उं.) येथे (दि.१५) रोजी पार पडली.
    यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, नवनियुक्त व सेवानिवृत्त मुख्याध्यापक  सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यात आदर्श सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बी.के.गवळी,आदर्श मुख्याध्यापक स्टीफन घोसाळ,आदर्श शिक्षक व्ही.जी.राठोड, एन.जी.लांडगे, आर.डी.चौधरी,विनायक गावित,विजय गावित,अजय निठूरे,सतिश इंगळे, भास्कर झिरवाळ, काळू भोये, विजय नेटके,विठ्ठल पाडवी,केशव महाले आदींसह नवनियुक्त मुख्याध्यापक संजय वाघ, आर.के.मोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.डी.पवार,पी.पी.खैरनार,जाधव सर तसेच आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अशोक भोये  आदींचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ पुष्प,व ट्राफी देवून  सत्कार करण्यात आला.
     यावेळी राज्य व नाशिक जिल्हा सचिव एस.बी.देशमुख यांनी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न उच्चस्तरीय पातळीवर सतत पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यादरम्यान सांगितले.यात अनुदानित आश्रम शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न,सातव्या वेतन आयोगाचा अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचा फरक, पीएफ व डीसीपीएस हप्त्यांच्या  पावत्या मिळवणे, २०% , ४०% अनुदानाचा प्रश्न,संचमान्यता, मूल्यवर्धित प्रश्न, कर्मचाऱ्यांचा आयडी, अनुदानावरील शाळा यात घोषित,अघोषित,  विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी, यांसह अनेक समस्यांचा निपटारा करण्यासाठी  मुख्याध्यापक संघाची भूमिका सकारात्मक असून काही प्रश्नांचा  शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी आश्वासित केल्याचे एस.बी.देशमुख यांनी यावेळी सांगितले.  
   यावेळी शासकीय आश्रम शाळा तथा सीटूचे राज्य सरचिटणीस बी.टी.भामरे,जिल्हा अध्यक्ष एस.के.सावंत,उपाध्यक्ष आर.के.सावंत, जिल्हा कमिटी सदस्य संजय वाघ,अनिल देवरे,सुभाष भामरे, प्रा.आर.एच.गांगुर्डे,प्राचार्य पी.के.चव्हाण, ए.जे.बागूल, के.एल.वाकचौरे,पी.के.कापडणीस, आदींची यावेळी भाषणे झाली.
    यावेळी जिल्हा कमिटीच्यावतीने नवनिर्वाचित तालुका मुख्याध्यापक संघाचा सत्कार करून पुढील  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   सदर बैठकी प्रसंगी आदर्श समता शिक्षण प्रसार मंडळ संस्थेचे सेक्रेटरी परशराम चौधरी, खजिनदार पांडुरंग भोये, संचालक के.डी.भोये, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बी.के.गवळी आदींसह तालुक्यातील अलंगुण,सुरगाणा,बोरगाव,बा-हे,खोकरी(उं.),आमदा, भावाडा,उंबरठाण,आंबाठा,गुही कुकुडणे,चिंचला,घागबारी,श्रीभूवन,करवंदे,भेगुसावरपाडा,शिंदे(दि.),खिर्डी,पांगारणे,काठीपाडा,म्हैसखडक आदी शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते. मिटिंगच्या दरम्यान तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टन्स ठेवून कोव्हिड-19 नियमांचे पालन करण्यात आले.

 मुख्याध्यापक संघ हा नावाप्रमाणे एकसंघ राहिला नसून त्याचे दोन गट झाले आहेत. त्यातील आर.डी.निकम यांच्या गटाने  शिक्षण उपसंचालक यांच्या नावाने पत्र लिहिले आहे.या पत्राचा विषय : आपल्या जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी यांना मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यास मनाई करण्याबाबत.
   हे पत्र सोशलमीडियात व्हायरल केले असून त्यावर कोणाचीही सही नाही आणि शिक्षणउपसंचालक कार्यालयाची रिसिव्हड नाही.
    याबाबत आमचे अलंगुण प्रतिनिधी आर.डी.भोये यांनी या प्रश्नावर जिल्हा अध्यक्ष सावंत यांची बाईट घेतली.   
   त्याविषयी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष एस.के.सावंत यांची  प्रतिक्रिया...

सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये

________

Also see :  रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा ठाणे जिल्ह्यात झंजावात 

https://www.theganimikava.com/Republican-Employees-Federations-storm-in-Thane-district