एनयुजे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर!

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्ची सदस्य असणा-या,एनयुजे इंडियाशी संलग्न नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची राज्य कार्यकारिणी सभा आँनलाईन आयोजित करण्यात आली.

एनयुजे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर!
NUJ Maharashtra state executive meeting approves important resolution

एनयुजे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर!
 

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्ची सदस्य असणा-या,एनयुजे इंडियाशी संलग्न नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची राज्य कार्यकारिणी सभा आँनलाईन आयोजित करण्यात आली.

एनयुजे महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला एनयुजे इंडियाचे वरिष्ठ नेते,एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी यांचे मार्गदर्शन लाभले.

कोरोना काळ संकटातही पत्रकारांना व इतरांना सहकार्य करणेबाबत शिवेंद्रकुमारजी यांनी अभिनंदन करुन वर्तमान कार्यकारिणीला मुदतवाढ दिलेबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.

एनयुजे इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती होऊनही महाराष्ट्रातील माध्यमकर्मी हितासाठी काम करणेसाठीचा एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांचे सर्वानी अभिनंदन केले.

संघटन सचिव कैलास उदमले यांनी प्रास्ताविकात सांगितले की,ज्या मजबुतीने एनयुजे महाराष्ट्र ची उभारणी शीतल करदेकर यांनी केली ती अभिनंदनीय असून महाराष्ट्रभरातील पत्रकार युनियनला जोडले जात आहेत.

राज्यातील पत्रकार समस्या व केलेली कामे जिल्हयाचे पदाधिकारी यांनी सादर केली, नवी मुंबईचे सुनिल कटेकर,रायगड अध्यक्ष सुवर्णा दिवेकर,पालघर अध्यक्ष विजय देसाई,कोल्हापुर अध्यक्ष डाँ.सुभाष सामंत ,औरंगाबादचे अध्यक्ष डाँ. अब्दूल कादीर,पुणे कार्याध्यक्ष रायचंद शिंदे,नाशिक अध्यक्ष राम ठाकूर,नंदुरबार अध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत,जळगावचे उमेश धनराळें,सांगली अध्यक्ष लक्ष्मणराव खटके,सातारा कार्याध्यक्ष डाँ.विनोद खाडे, रत्नागिरीचे समन्वयक प्रकाश वराडकर,ठाणे समन्वयक तुषार गोसावी, उस्मानाबादचे गुणवंत दांगट, नागपुर समन्वयक कृष्णा म्हस्के, सिंधुदुर्गचे लक्ष्मण आढाव,धुळे अध्यक्ष विशाल ठाकूर यांनी जिल्ह्यातील कामे व समस्यांची माहिती दिली.

यांचेसह कायदेसल्लागार अँड स्वप्निल पाटील,शेखर धोंगडे , महेश चौगुले,अनिल गुरव, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागिरदार ,राज्य सहसचिव महेंद्र जगताप,कार्यकारिणी सदस्य रचना बो-हाडे,संतोष राजदेव, प्रवक्ते संदिप टक्के ,सचिव नमिता,पुनम शर्मा यांनी आपल्या भुमिका व्यक्त केल्या.

सरचिटणीस सीमा भोईर यांनी एनयुजे इंडियाचे आंदोलन व एनयुजे महाराष्ट्रचे कामाची माहिती देताना पुढील कामाची माहिती दिली.संघटन सचिव विशाल सावंत यांनी येत्या काळात संघटन मजबूतीसाठीचे कामाची माहिती दिली.

येत्या काळात एनयुजेएम महाराष्ट्रात एक चळवळ उभी करणार आहे,पत्रकार रजिस्ट्रेशन त्यात सामुदायिक आरोग्य विमा,पत्रकार महामंडळ,पत्रकार सर्वसुरक्षाधोरण,माध्यमांसाठी व माध्यमकर्मींसाठी आर्थिक सहायता याबाबत निवेदन देणेत येणार आहे.

तर ज्यांचेवर खोट्या तक्रारी दाखल करून खटले दाखल केले ते मागे घेणे,वृत्तपत्रे व चँनल्समधून तडकाफडकी कर्मचाऱ्यांना काढले जात आहे, कोणतीही बोलणी न करता पगारात भरमसाठ कपात होत आहे.त्याबाबत निवेदने सरकारला दिली असून नवीन कामगार कायद्यात ज्या प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी आणि इतर कर्मचारी यांचेवर अन्याय करण्यात आला असून सर्व माध्यमकर्मींसाठी राज्य सरकारने तातडीने त्रिपक्षिय समिती गठण करणे आवश्यक आहे,तसेच सर्वसमावेशक हितासाठी पत्रकार विकास महामंडळ निर्माण करुन त्याद्वारे समस्या सोडविण्याची धोरणे ठरवली जावीत असा ठराव मंजूर करण्यात आला.सरकार निवेदने देऊन तातडीने कृती करणार नसेल तर यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाईल अशी भूमिका अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केली .

कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी कोरोना योद्धा म्हणून घोषित करुनही कोरोनाने बाधित होऊन मृत्यु पावलेल्या पत्रकार व इतर माध्यमकर्मींसाठीचा ५०लाखाचे विमा संरक्षण सहायता त्या कुटुंबाला तातडीने मिळावी म्हणून सरकारकडे युनियन करत असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

सफाळे पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

________

Also see : एकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा.श्री. प्रशांत बापूसो भोसले यांची निवड

https://www.theganimikava.com/Honable-Shri-Selection-of-Prashant-Bapuso-Bhosale