राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकणार ओबीसींचा आवाज - राज राजापूरकर

ओबीसी जनगणना आणि ओबीसींच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी वाडा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकणार ओबीसींचा आवाज - राज राजापूरकर
NCP will listen to the voice of OBCs - Raj Rajapurkar

राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकणार ओबीसींचा आवाज - राज राजापूरकर

वाडा : ओबीसी (OBC) जनगणना आणि ओबीसींच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी वाडा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी (OBC) सेलच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी (OBC) सेलचे राज्य समन्वयक व कोकण प्रभारी  राज राजापूरकर उपस्थित होते.

या बैठकीस राष्ट्रवादी ओबीसी (OBC) सेलचे पालघर जिल्हाध्यक्ष नरेश आकरे, वाडा तालुका अध्यक्ष गणेश पाटील तसेच पालघर जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे, वाडा तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, वाडा पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील,पालघर जि. प.सदस्य शशिकांत पाटील, वाडा शहर अध्यक्ष अमिन सेंदू, वाडा तालुका उपाध्यक्ष युवराज ठाकरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल वेखंडे, युवानेते राजेश चौधरी, रोहिदास शेलार, मिलिंद पाटील, विश्वजीत गोळे, विराज पाटील इ. पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ओबीसी (OBC) जनगणना, ओबीसी शिष्यवृत्ती तसे बिगर आदिवासींचे नोकऱ्यांमधील आरक्षण या विषयांमधून ओबीसी प्रवर्गावर झालेल्या अन्यायाबाबत प्रभावी भूमिका घेण्याची मागणी केली.

यावर राजापूरकर यांनी सर्व भूमिका समजून घेऊन प्रभावी मार्गदर्शन केले व या सर्व विषयांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ओबीसी नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बरोबरोबर लवकरच बैठक लावून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसींचा आवाज ऐकणार असल्याचे आश्ववासन दिले.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

________

Also see : माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मोहप गावाला भेट 

https://www.theganimikava.com/District-Collector-Rajesh-Narvekars-visit-to-Mohap-village-under-My-Family-My-Responsibility-Campaign