बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज...
टीव्ही 9 मराठी दिलेल्या माहिती नुसार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची या जाहीर केली आहे...

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज.
टीव्ही 9 मराठी दिलेल्या माहिती नुसार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची या जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 39 नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
______________
Also see : दिंद्रुड पोलिसांची मनमानी; गंभीर वार झालेले आसतांनी सुध्दा गुन्हा नोंद करण्याची टाळाटाळी !!