चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय : हसन मुश्रीफ

चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे," असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय : हसन मुश्रीफ
NCP leader Hasan Mushrif

चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय : हसन मुश्रीफ

Where is all Chandrakantdada's 'love': Hasan Mushrif

चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केले होते. या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले, तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे.

“चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळे तीन अब्रूनुकसानीचे दावे केले आहेत. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. हसन मुश्रीफ  यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांतदादांकडे दोन नंबरचं पद आहे. तरीही त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात एक मतदार तयार करता आला नाही. मी पाचवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकून आलो आहे. पुढच्यावेळी कदाचित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यसभेत जातील. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील नागपूरमधूनही विधानसभा निवडणूक लढवतील, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

चंद्रकांतदादांना तयार मतदारसंघात जाण्याची सवयच आहे. त्यांच्या या अफाट लोकप्रियेबाबत मला काहीच बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.