माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत करणार ४ लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण

कोविडमुक्त कल्याण डोंबिवलीसाठी प्रयत्नशील – पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी......

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत करणार ४ लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण

कोविडमुक्त कल्याण डोंबिवलीसाठी प्रयत्नशील – पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण (kalyan) : माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत कोविडमुक्त (covid) कल्याण डोंबिवलीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून याअंतर्गत ४ लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. २५ दिवसांत ४०० टीमच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कोविड १९ चा (covid 19) प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतांना शासन स्तरावर, महापालिका (mucipal corporation) स्तरावर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक प्रयत्न होत आहेत. कोविड-१९ वर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ही मोहिम राबविण्यात येत असून कल्याण डोंबिवली मध्ये देखील हि मोहीम राबवली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष अशासकीय संस्थाच्या (एन.जी.ओ.) सहाकार्यान व सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड (covid)  नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पध्दतीचा अंगिकार करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे.

ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महापालिकेमार्फत सुमारे ४०० पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत देण्यात आलेले २ स्वयंसेवक व महापालिकेचा १ आरोग्य कर्मचारी यांचा अंतर्भाव असेल. सदर पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. मोहिमेच्या एकुण कालावधीत सदर पथके कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक घरी दोन वेळा भेटी देतील. या भेटीमध्ये घरातील सर्व व्यक्तींना वैयक्तिक/ कौटूंबिक, सोसायटी व वसाहतीमध्ये वावरतांना, दुकाने/ मंडया/मॉल्समध्ये खरेदी इ., कार्यस्थळी व कार्यालयांमध्ये घ्यावयाची खबरदारी तसेच खाजगी/सार्वजनिकरित्या प्रवास करतांना घ्यावयाची दक्षता या संदर्भात माहिती तथा मार्गदर्शन केले जाणार आहे.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल मेहेत्रे

_______

Also see : राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी आर. एन. यादव

https://www.theganimikava.com/R.-as-the-Vice-President-of-the-NCP.-N.-Yadav