माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यासाठी मुरबाड पंचायत समिती बरोबर नगरपंचायत ही सज्ज
गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण या चतू:सूत्रीचा वापर.....
माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यासाठी मुरबाड पंचायत समिती बरोबर नगरपंचायत ही सज्ज
मुख्याधिकारी परितोष कंकाळ
गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण या चतू:सूत्रीचा वापर
कोव्हीड १९ (covid 19) या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. १५ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण (Health education) या चतू:सूत्रीचा वापर केला जाणार आहे.
१५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० आणि १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या दोन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच कोव्हीडचा (covid) वाढता प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पथकांची निर्मिती
पथकात नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा/अंगणवाडी सेविका, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक घरी भेट देऊन थर्मल स्कॅनर द्वारे कुटुंबातील प्रत्येकाचे तापमान आणि प्लस ऑक्सिजनमीटरणे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मोजतील. या दरम्यान कोणी कोव्हीड (covid) संशयित असेल त्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करतील. तसेच मधुमेह, ह्रदय विकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या अतिजोखीम गटातील व्यक्ती शोधून काढणे, व त्यांची काळजी घेणे, तसेच त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार करणे याचाही अंतर्भाव या मोहिमेत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या पथका मार्फत प्रत्येकाला आरोग्य शिक्षण (Health education), आरोग्य संदेश दिला जाणार आहे. पथकातील प्रत्येकजण कोव्हीड १९ चे सर्व नियम पाळून गृहभेटी देतील. ही मोहीम सर्व नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनधी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा छाया चौधरी व मुख्याधिकारी परितोष
कंकाळ यांनी केले आहे.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_______
Also see : कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी
https://www.theganimikava.com/NCP-demands-free-treatment-for-Corona-patients