भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावातील 21वर्षीय तरुणाची हत्या   

भिवंडी तालुक्यातील करंजोटी येथील आकाश नारायण शेलार या 21 वर्षीय तरुणाची गळा आवळून आणि नंतर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे

भिवंडी तालुक्यातील करंजोटी येथील आकाश नारायण शेलार या 21 वर्षीय तरुणाची गळा आवळून आणि नंतर वार करून निर्घृण हत्या (murder) करण्यात आली आहे. शेलार दांप्तत्याला आकाश हे एकच मुलगा होता. त्याची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

       आकाश हा जिंदाल कंपनीत (company) कामाला होता. आरोपींनी आकाशला फोन करून शेतात बोलावून घेतलं आणि त्यानंतर त्याची  निर्घृण हत्या करण्यात आली आहे . या घटनेनंतर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं यावर पडघा पोलिसांनी तात्काळ  घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून जाऊन आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात (hospital) पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्टच  आहे.

भिवंडी ,ठाणे

प्रतिनिधी - सत्यवान तरे

__________

Also see : श्री. पद्माकर वळवी यांच्या  पालघर जिल्हा दौय्रानिमित्त विविध समितीची जव्हार शासकीय विश्रामगृह येथे  भेट.

https://www.theganimikava.com/On-the-occasion-of-Padmakar-Valvis-visit-to-Palghar-district-various-committees-visited-Jawahar-Government-Rest-House